मालवण पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप नियुक्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पदभार स्वीकारला आहे.
कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून मारुती जगताप यांची ओळख आहे. २००९ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून अमरावती येथून त्यांची पोलीस दलातील सेवा सुरु झाली. त्यानंतर एपीआय म्हणून त्यांना बढती मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, तसेच कोल्हापूर याठिकाणी त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर २०२१ साली पोलीस निरीक्षक पदी त्यांची बढती झाली. रत्नागिरी येथे त्यांनी २०२४ पर्यंत सेवा बजावली. नंतर ठाणे ग्रामीण शहापूर पोलीस ठाणे व त्यानंतर जुलै २०२४ पासून कणकवली पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आता मालवण पोलीस ठाणे येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)