ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली मेढा - राजकोट वासियांची वीज कार्यालयावर धडक.

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली मेढा - राजकोट वासियांची वीज कार्यालयावर धडक.

प्रकाशन: 26 Jun 2025 11:01 AM
वाचन संख्या 39

आठवड्याभरात स्ट्रीट लाईट सुरू होतील; उपअभियंता सचिन मेहेत्रे यांचे आश्वासन.

मालवण | ब्यूरो न्यूज : शहरातील मेढा राजकोट भागात गेले दोन महिने स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटन व्यावसायिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याबाबत बुधवार, २५ जून रोजी मेढा राजकोट भागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. बंद स्ट्रीट लाईटबाबत वीज वितरण कंपनीचे वारंवार लक्ष वेधून देखील स्ट्रीट लाईट सुरु करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याची तीव्र नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. यावर मालवणचे उपअभियंता सचिन मेहेत्रे यांनी येत्या आठवड्याभरात मेढा राजकोट परिसरातील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत नागरिकांनी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण वीज कार्यालयात जाऊन उपअभियंता सचिन मेहेत्रे यांचे लक्ष वेधत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जावकर यांच्या समवेत बंड्या सरमळकर, उमेश परब, रुजाय फर्नांडिस, महेश केळूसकर, सतीश सरमळकर, निलेश सावंत, संजय टेमकर, सागर पाटकर, रुपेश पाटकर, सुनील शिरोडकर, लुईस फर्नांडिस, राजाराम पारकर, यश पारकर, रघुनाथ केळूसकर, प्रसाद सकपाळ, भाग्यश्री लाकडे- खान, तेजस कांदळकर आदी उपस्थित होते.

मेढा राजकोट परिसरात रॉक गार्डन, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला व शिवरायांचा पुतळा अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे या भागात नागरिक व पर्यटक यांची मोठी वर्दळ असते. मात्र रात्रीच्या वेळी या भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे.

रस्त्यांवर काळोख असल्याने पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. गेले दोन महिने स्ट्रीट लाईट बंद आहेत. सध्या पावसाळ्यात रात्रीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरून काळोखात ये – जा करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. याबाबत वीज वितरण कार्यालयात तक्रारी देऊनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तक्रार दिल्यावर लाईन फॉल्ट आहे एवढेच सांगितले जाते. तसेच अनेकदा तक्रार करण्यासाठी असलेल्या फोन नंबर वर कॉल केला असता फोन उचलला जात नाही. वायरमनही व्यवस्थित काम करत नाहीत, त्यांच्या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, स्ट्रीट लाईट चालू- बंद करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही अशा तक्रारी यावेळी महेश जावकर यांच्यासह नागरिकांनी मांडल्या. मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट लवकरात कराव्यात तसेच रोझरी चर्च ते रॉक गार्डन ते जय गणेश मंदिर पर्यंतच्या स्ट्रीट लाईट व्यवस्थित दुरुस्त करून कायमस्वरूपी कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

यावर उप अभियंता सचिन मेहेत्रे म्हणाले, साध्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने वीज लाईन दुरुस्तीच्या कामात वीज कर्मचारी अडकले आहेत. यामध्ये शहरातील स्ट्रीट लाईटकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे आम्ही मान्य करतो. मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईटची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करून येत्या आठवडाभरात स्ट्रीट लाईट सुरु करण्यात येतील असे आश्वासन श्री. मेहेत्रे यांनी दिले. तसेच तक्रारीसाठी कार्यालयातील फोन उचलला जाईल याबाबत योग्य ती काळजी घेऊ. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट चालू व बंद करण्याची कायदेशीर जबाबदारी नगरपालिकेची असून याबाबत यापूर्वीच नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे, तरीही याबाबत पुन्हा बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, श्री. मेहेत्रे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स