सेवांगण कट्टाच्या रौप्यमहोत्सवी शिष्यवृत्ती वर्गाचा शुभारंभ.
मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे ५ वी शिष्यवृती व ८ वी NMMS या मोफत शिष्यवृती वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. या शिष्यवृत्ती वर्गाचे हे २५ वे वर्ष आहे. सन २००० साली या शिष्यवृत्ती वर्गाचा शुभारंभ करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे व नांदोसकर गुरुजी यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका संपदा भाट यांनी सेवांगण कट्टा शाखा सातत्याने २५ वर्ष हा उपक्रम चालवत आहे याबद्दल कौतुक केले.
या शिष्यवृत्ती वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज काळसेकर यांनी संपूर्ण वर्गाची रुपरेषा पालकांना समजावून सांगितली. यावेळी सर्व मुलांना वाचनासाठी पुस्तके देण्यात आली.
यावेळी कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, दीपक भोगटे, नांदोसकर गुरुजी, संपदा भाट, मनोज काळसेकर, विद्याधर चिंदरकर, भोजणे, बाळकृष्ण गोंधळी, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)