ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे मालवण नगरपालिका प्रशासनाकडे मागणी.

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे मालवण नगरपालिका प्रशासनाकडे मागणी.

प्रकाशन: 24 Jun 2025 10:48 PM
वाचन संख्या 139

मालवण | ब्यूरो न्यूज : देऊळवाडा येथे बांधलेल्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आल्याने भरडेवाडा व आडवण येथून येणारे पावसाचे पाणी अडले जाऊन तेथील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा भराव काढून टाकावा, अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, मालवण तर्फे मालवण नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

याबाबतचे निवेदन मालवण नगरपालिका अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. यावेळी ह्युमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, तालुका अध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक सचिव विनोद वेंगुर्लेकर, सुनील फाटक आदी उपस्थित होते.

मालवण देऊळवाडा येथील कवटकर घर ते बर्फ फॅक्टरी दरम्यान मालवण स्टॅन्ड ते कसाल रस्त्याला पावसाचे पाणी जाण्याची मोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली होती. त्या मोरीतून भरडेवाडा व आडवण येथून वाहून येणारे पावसाचे पाणी त्या मोरीतून वाहून जायचे. मात्र आता त्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आली आहे. त्यामुळे पावसात तेथील रहिवाश्यांच्या घरांना धोका निर्माण होवू शकतो. तसेच उत्पन्नाची झाडेही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. हा भराव काढून टाकून मोरी खुली करावी, ही मोरी खुली न केल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मालवण नगरपालिका राहील असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच वायरी मुस्लीम मोहल्ला ते दिघे डॉक्टर यांच्या घरासमोरून महाराजा हॉटेल पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यातील पाणी वाहण्याचा मार्ग गटारातून बंद झालेला आहे, तो त्वरीत खुला करून देण्यात यावा व गटारातील मातीचे भराव टाकून बुजविलेली गटारे खुली करावीत, मागणी निवेदनात केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स