ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मुंबईमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन.

मुंबईमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन.

प्रकाशन: 21 Jun 2025 09:31 PM
वाचन संख्या 28

मसुरे | प्रतिनिधी : जागतिकीकरणाच्या युगात देशातील सर्वच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजनी आपली परिणामकारकता वाढवली पाहिजे. महाराष्ट्र हा देशाच्या औद्योगिक प्रगतीचे नेहमीच प्रतीक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय, गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केले. मुंबई येथे गुरुवार, १९ जून रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मंगलप्रभात लोढा, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, चेंबर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब, रमाकांत मालू, मिलिंद गुप्ता, संजय सोनवणे, संगीता पाटील, मालाणी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स