ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूहाचा २२ जून रोजी साहित्यिक मेळावा.
मालवण | प्रतिनिधी : ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूह, सिंधुदुर्गच्या वतीने २२ जून रोजी साहित्यिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम अलका नारकर यांच्या निवासस्थानी, फणसगाव येथे होणार आहे.
सकाळी ११:०० वाजता स्वागत, रुजवण व समूहातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचा सन्मान, ११:३० ते १:३० वैशाली पंडित यांच्या कथेच्या जन्माची कथा या विषयावर चर्चा आणि अनुभवकथन करण्यात येणार आहे. दुपारी २:३० ते ४:०० समूहातील सदस्यांचे साहित्य सादरीकरण होणार आहे.
यावेळी ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूह, सिंधुदुर्गच्या सदस्या अलका नारकर यांनी समूहातील सदस्यांना तसेच निमंत्रित केलेल्या महिलांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)