ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणमध्ये गाबीत समाज बांधवांशी २१ जून रोजी बैठक.

मालवणमध्ये गाबीत समाज बांधवांशी २१ जून रोजी बैठक.

प्रकाशन: 20 Jun 2025 04:31 PM
वाचन संख्या 32

मालवण | ब्यूरो न्यूज : महायुती सरकार मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहेत. अनेक योजना मच्छिमार समाजाला प्राप्त होत असताना गाबीत समाजाने आपल्या समाज बांधवांसाठी शासकीय स्तरावर विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाबीत समाज समस्या निवारण मंच स्थापना करून त्या माध्यमातून गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी मंत्रालय स्तरावर मिटिंग झाली आहे. याची माहिती समाज बांधवांपर्यंत देण्याचे कार्य सुरु आहे.

यासाठी गाबीत समाज समस्या निवारण मंचाचे अध्यक्ष सुनिल जोशी हे प्रत्यक्ष मालवण येथे उपस्थित राहून समाज बांधवांशी सवांद साधणार आहेत. त्यांच्या सोबत सखाराम मालाडकर (मालवण), अरविंद मालाडकर (रत्नागिरी) तसेच मंच सदस्य सहभागी होणार आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मंच प्रयत्नशील आहे.

मालवण मध्ये महामंडळ बाबत माहिती तसेच समाजातील बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. २१ जून रोजी मालवण येथे विष्णू मोंडकर हॉटेल श्री महाराज, मालवण पेट्रोलपंप नजीक सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व समाज बांधवानी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती सदस्य विष्णू मोंडकर तसेच संयोजक गाबीत समाज समस्या मंच यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स