राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर नियुक्त.
कणकवली | ब्यूरो न्यूज : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते श्री. कडूलकर यांना नुकतेचे हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी निशीकांत कडूलकर यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी ही नियुक्तीची शिफारस केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, केदार खोत, चौगुले आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)