दशावतार कलाकारांच्या संघटनेसाठी शिवसेनेकडून एक लाखाची मदत.
आमदार निलेश राणे यांच्या वतीने जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी मदत केली सुपूर्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : दशावतार कलाकारांच्या संघटनेसाठी शिवसेनेच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सदरची मदत गुरुवार, जून रोजी घुमडे येथील घुमडाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आली.
दशावतार कलाकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना निर्माण होत असल्याने या संघटनेला जिल्ह्यातील सर्व सभासद सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचे काम वाढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सदरची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या मदतीने दशावतार कलाकारांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)