कट्टा येथील ॲड. संपदा खटावकर पिसे यांना पीएचडी पदवी प्रदान.
कट्टा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील कट्टा गावातील कन्या आणि आनंदी लॉ कॉलेजच्या इन्चार्ज प्रिन्सिपल ॲड. संपदा खटावकर पिसे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
त्यांनी ‘ईक्वल जस्टीस अँड फ्री लीगल एड टू द पूअर विथ स्पेशल रेफ्रन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोशिवो लीगल स्टडी’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना शहाजी लाॅ काॅलेज कोल्हापूरचे माजी प्राचार्य डॉ. नारायण रायदुर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. याबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)