ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चौके जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न.

चौके जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 18 Jun 2025 11:18 AM
वाचन संख्या 39

मालवण | ब्यूरो न्यूज : प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी शासनाने नवीन शैक्षणिक धोरण अवलंबिले आहे आणि सीबीएससी पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे. मुलांनी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिक्षकांनी तसेच पालक, ग्रामस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले.

चौके जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते मुलांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी चौके सरपंच पी. के. चौकेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, शिक्षक सदस्य सुरेश चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, ग्राम अधिकारी लक्ष्मण सरमळकर, मुख्याध्यापिका भाग्यश्री कुरणे, शिक्षिका मनीषा ढाके, श्रीमती कांबळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापिका भाग्यश्री कुरणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सरपंच पी. के. चौकेकर, शिक्षक सदस्य सुरेश चौकेकर यांनी मार्गदर्शन केले. मनीषा ढाके यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 294

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स