भंडारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व दशावतारी कलाकारांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा माडये हॉल येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीगणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी गुणवंत तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. उद्योजक रुपेश पावसकर, श्री. माडये, ॲड. श्वेता तेंडूलकर, गौरी नार्वेकर, शाम वाक्कर, बाबुराव मसुरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कट्टा भंडारी समाजाचे अध्यक्ष मामा माडये, सुकळवाड गावराई भंडारी समाज अध्यक्ष बाबुराव मसुरकर, खजिनदार वासुदेव पावसकर, सदस्य मामा बांदिवडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप आवळेगावकर, देवली सरपंच शाम वाक्कर, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, तळगाव सरपंच लता खोत, ॲड. श्वेता तेंडुलकर, वर्षा मिठबावकर, रुद्रा पावसकर, गौरी नार्वेकर, गीता नाईक, त्रिशा हडकर, अक्षता मिठबावकर, प्रांजल नांदोसकर, वैदेही मसुरकर, द्रौपदी सरमळकर, उद्योजक भाऊ नार्वेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश सरमळकर, शरद केळुसकर, प्रगतशील शेतकरी संदेश नाईक, विवेक जबडे, किशोर वाक्कर, महेश वाईरकर, शरद मांजरेकर, अभय तेंडुलकर, प्रवीण मिठबावकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, निलेश हडकर, मंगेश माडये, अजय मयेकर, सुरेश कांबळी, सुनील पोखरणकर, विद्याधर चिंदरकर, योगेश पाटकर, जीजी वाईरकर, सुनील शिरोडकर, वराडकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी भंडारी समाजातील नामवंत दशावतारी कलाकारांचा देखील सत्कार करण्यात आला. भंडारी समाजातील निवडक दशावतारी कलाकारांचे रथी सारथी संग्राम हे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती मयेकर यांनी केले तर आभार अश्विनी पेडणेकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)