शिवसेना युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी संग्राम साळसकर नियुक्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : पक्ष युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुडाळ – मालवण पदी मालवण येथील युवा नेतृत्व संग्राम सुधीर साळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडणाऱ्या संग्राम यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली असून पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे अशी माहिती मिळत आहे.
नियुक्ती नंतर संग्राम साळसकर यांनी युवासेना सर्व वरिष्ठ नेतृत्वांचे आभार व्यक्त करताना आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. आमदार निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. दहा वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मतदारसंघाला नवसंजीवनी दिली. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. अपेक्षित असे काम करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे संग्राम साळसकर यांनी म्हणले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)