कवींना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन.
अनुबंध प्रतिष्ठानच्या वतीने कै . योगिता माळी राज्यस्तरीय काव्यपुरस्कार.
ब्यूरो न्यूज : कै. योगिता माळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, २५ जुलै २०२५ रोजी ,अनुबंध प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील कवींच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार दिला जात आहे.
प्रथम पुरस्कार रु ५,०००/ व्दितीय रु ३,०००/ तृतीय रु २,०००/ – तसेच आकर्षक मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
यासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित काव्यसंग्रहाच्या दोन प्रति कवी, प्रकाशकांनी कवीचा अल्पपरिचय, छायाचित्रासह १५ जुलैपर्यंत खालील पत्त्यावर पाठवाव्यात अशी माहिती व आवाहन कै. योगिता माळी यांचे पती श्री. विलास माळी यांनी दिली आहे.
पत्ता : ‘अनुबंध ‘ निवास पाटील कॉलनी (यमगेकर कॉलनी शेजारी) संकेश्वर रोड. मु . पो . ता . गडहिंग्लज, जि. कोल्हापूर . पिन : ४१६५०२.
अधिक माहितीसाठी
९४२२०३३८४० या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)