ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

प्रकाशन: 13 Jun 2025 09:33 PM
वाचन संख्या 578

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ महाविद्यालयातून ‘पाच वर्षांचा’ मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण.

मालवण | प्रतिनिधी : व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी, एलएलबी २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच वर्षांच्या कायदे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत, पाच वर्षांच्या या कायदे अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातून प्रथम श्रेणी व प्रथम क्रमांक असे यश संपादन केल्याबद्दल, सहिष्णू पंडित यांनी व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे चेअरमन व्हिक्टर डांटस आणि प्राचार्या सौ. शिल्पा मर्गज व महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी, महाविद्यालयीन वरीष्ठ व सह अध्यायी मंडळी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सहिष्णू पंडित हे , मालवण टोपीवाला हायस्कूलचे माजी शिक्षक कै. श्रीनिवास पंडित व मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे नातू आणि रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित आणि आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांचे चिरंजीव आहेत.

त्यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मालवणातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स