ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा.

प्रकाशन: 11 Jun 2025 04:55 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्रतिनिधी : दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभागवार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी आमची संस्था आणि आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. यापुढे सुद्धा या सर्व बांधवांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहून काम करणार आहे. तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कधीही आवाज द्या मी सदैव तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले.

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल, सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने मसुरे येथे मर्डे ग्रामपंचायत सभागृहात दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मर्डे ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी शंकर कोळसुलकर , दत्तप्रसाद पेडणेकर, भानुदास धुरी, वेरळ उपसरपंच दिनेश परब, माजी ग्रामपंचायत सदस्य राघवेंद्र मुळीक, संस्था कर्मचारी विशाखा कासले, संजना गावडे, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार संस्था कर्मचारी दीपक चव्हाण, संजना गावडे, विशाखा कासले यांनी केले. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत याबाबत दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर म्हणाले, शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायती स्तरावरती सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी असून यासाठी दिव्यांग बांधवांना जे सहकार्य लागेल ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण वेळोवेळी देत आहोत. या सर्व बांधवांनी परिपूर्ण कागदपत्रांसहित या सर्व योजनांचा परिपूर्ण लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.

संस्था कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेचे कामकाज आणि दिव्यांग बांधवांसाठी करीत असलेले काम याबाबत अहवाल वाचन केले. यावेळी तीन दिव्यांग बांधवांना पेन्शन योजना करण्यासाठी, सहा दिव्यांग बांधवांना घरघंटी प्रस्ताव करण्यासाठी फॉर्म वाटप करण्यात येऊन कागदपत्रांची माहिती देण्यात आली. अकरा दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली. या मेळाव्याला ४० हून जास्त दिव्यांग उपस्थित होते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने आसिफ अब्दुल कलाम शेख यांना अंधकाठी देण्यात आली. संस्था कर्मचारी संजना गावडे यांनी आभार मानले.

यावेळी संस्थेच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यम मापारी, लक्ष्मण शिंगाडे, रेश्मा पालव, मंगल भोगले, जयवंत मांजरेकर, प्रणाली मापारी, सुनील ठाकूर, सागर ठाकूर, रमाकांत पाटील, सुनंदा खरात, कृष्णा खोत, सूर्यकांत सावंत, साक्षी बागवे, रुपेश लोखंडे, अहमद सय्यद, रतन ठाकूर, विजया दुखंडे, लक्ष्मी शिंदे, उपस्थित होते.

मसुरे, बांदिवडे खुर्द, बांदिवडे बुद्रुक, वेरळ, बिळवस, देऊळवाडा या गावातील दिव्यांगांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाइन प्रमाणपत्र, रेल्वे पास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल आदी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती मान्यवरांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स