ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
विद्युत अभियंता अनिल मठकर यांचा बदलीनिमित आचरा वासियांतर्फे गौरव.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विद्युत अभियंता अनिल मठकर यांचा बदलीनिमित आचरा वासियांतर्फे गौरव.

प्रकाशन: 11 Jun 2025 03:36 PM
वाचन संख्या 34

आचरा | प्रतिनिधी : वीज समस्या सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांसोबत काम करणारे विद्युत अभियंता अनिल मठकर यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या बदलीमुळे आम्हाला कायम त्यांची उणीव जाणवेल, असे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी ग्रामपंचायत आचरा येथे व्यक्त केले.

आपल्या कार्यतत्परतेने गेली दोन वर्षे नेहमी वीज समस्या निवारणासाठी झटणारे अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेले आचरा येथे कार्यरत सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांच्या बदलीनिमित्त आचरा ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मठकर यांनी येथील ग्रामस्थांचे प्रेम व आपुलकीमुळे काम करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. नेहमी सहकार्य देणारे आचरे सारखे दुसरे गाव नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी यांनी मठकर यांच्या कामाचा गौरव केला. सरपंच जेराॅन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांच्या तर्फे मठकर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आचरा उपसरपंच संतोष मिराशी, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, नरेश परब, अजित घाडी, संदिप पांगम, निखिल ढेकणे, सौमित्र राणे, पाटील विठ्ठल धुरी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...

30 Oct 2026 236

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स