कुडाळ नेरूर – वाघोसेवाडी परिसरात आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्गातील कुडाळ नेरूर – वाघोसेवाडी येथे ॲटलस मॉथ नावाचा अतिशय दुर्मिळ पतंग आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना मोठा पतंग आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे.
हा पतंग १२ इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. हा पतंग दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो. मात्र हा पतंग कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)