कवठी येथे उबाठा शाखाप्रमुख तसेच सहकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
मालवण | ब्यूरो न्यूज : कवठी येथील उबाठा शाखाप्रमुख गोपाळ कवठकर यांसह सहकाऱ्यांनी शुक्रवार, ०६ जून रोजी आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्य व नेतृत्वावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, दादा साईल यांसह मनिष वाडयेकर, राजू राणे, भास्कर खडपकर, शेखर मेस्त्री, भूषण राणे, आनंद परुळेकर अन्य पदाधिकारी तसेच प्रवेशकर्ते गोपाळ कवठकर यांसह प्रकाश राणे, गणपत शिरगांवकर, मेस्त्री आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)