मालवणात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत सुमारे दोन कोटी मंजूर निधीतून उभारणी करण्यात आलेल्या मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार, ०६ जून रोजी संपन्न झाले. मालवण नगरपरिषद परिसरात अग्निशमन कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज १ (विंग ए) या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्निशमन केंद्र कार्यालय, स्टोअर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस, तर दुसरा मजला दोन प्रशस्त टू बीएचके रूम (अधिकारी निवासस्थान) असे इमारतीचे स्वरूप आहे.
मालवण शहर आता प्रगतीच्या मार्गावर चाललेले शहर आहे. याठिकाणी शासनाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून शहरवासियांबरोबरच पर्यटकांनाही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे भविष्यात उभारण्यात आलेल्या इमारतीच्या नियोजनाची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहणार आहे. यामुळे मालवणात येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देताना पर्यटन कराबद्दलही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नगरपालिकेला आवश्यक असणारा सर्व निधी उपलब्ध करून देऊन मालवणवासियांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी यावेळी केले.
यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकारी सोनाली हळदणकर यांनी इमारतीच्या बांधकामासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची इचलकरंजी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बढतीपर बदली झाल्याबद्दल आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार वर्षा झालटे, मालवण कुडाळ मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, दिपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, पंकज सादये, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संजय पडते, गणेश कुशे, किसन मांजरेकर, पूजा करलकर, आप्पा लुडबे, राजा गावकर, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, संदीप भोजने, नानाशेठ पारकर, मोहन शिरसाट, राजन सरमळकर, राजू बिडये, अंजना सामंत, अभय कदम, परशुराम पाटकर, सोनाली पाटकर, मोहन वराडकर, तारका चव्हाण, मधुरा तुळसकर, अरूण तोडणकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी तर सूत्रसंचालन नगरपालिका अधिकारी सुधाकर पाटकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)