पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त 'अहिल्या भीम पर्व' कार्यक्रम संपन्न.
ब्यूरो न्यूज : समृद्धी पब्लिकेशन, सिंधुदुर्ग आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘अहिल्या भीम पर्व’ कला, सामाजिक, साहित्य संमेलनाचे १ जून रोजी, सिंधुदुर्ग नगरी (ओरोस) येथे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देऊन हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरानी समृद्धी पब्लिकेशनच्या कामांची विशेष प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. एन. खरात यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध वृत्त यंत्रणेतील डेस्क विभागाचे श्री. अवधूत पोइपकर तसेच मसुरे गावची विविध क्षेत्र व स्तरावर बालपणापासून चमकणारी व विविध पुरस्कार प्राप्त कु. वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर यांना राज्यस्तरीय मातृभूमी सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गोव्याचे सुप्रसिद्ध गझलकार अजय नाईक यांचे गझल सादरीकरण संपन्न झाले. तसेच जिल्ह्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान आणि विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यवीरांचे सत्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्गातील लोप पावत असलेल्या पारंपारिक कलांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक बी.के.जी चे संचालक डॉ. दत्तात्रय करपे, पुणे येथील दिग्दर्शक, निर्माता, लेखक श्री. संदीप राक्षे, मुरबाड येथील उद्योजक दिनेश उघडे, पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. एन. जी. खरात, पंचशील ट्रस्टचे अध्यक्ष – संजय खोटलेकर, गोवा येथील सुप्रसिद्ध गीतकार व गझलकार अजय नाईक, महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. दशरथ शिंगारे, भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. यशवंतराव शेळके, उत्तीर्ण बिरदेव डोणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन समृद्धी पब्लिकेशनचे संचालक डॉ. बी. एन.खरात यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कारेकर यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र कुमार चव्हाण यांनी केले. यावेळी प्राध्यापक बी. एन. खरात यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)