ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात ६ जून रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात ६ जून रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा.

प्रकाशन: 04 Jun 2025 10:29 PM
वाचन संख्या 26

मालवण | ब्यूरो न्यूज : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांच्यासाठी दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता संस्कार सभागृह (टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड नजिक) धुरीवाडा, मालवण येथे, जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे आणि राज्य संघटक श्री. सर्जेराव जाधव, राज्य सहसचिव प्रा. एस. एन. पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे माजी सदस्य श्री. कमलाकांत कुबल तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व मालवणचे ज्येष्ठ डॉ. राहुल पंतवालावलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेमध्ये सातबारा वाचन- श्री. सर्जेराव जाधव, ग्राहक पंचायतची रचना आणि कार्यपद्धती- प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपध्दती- श्री. कमलाकांत कुबल व श्रीम. वफा खान, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार- श्री. सिताराम कुडतरकर, सजग विद्यार्थी ग्राहक अभियान – श्रीम. श्रध्दा कदम व ग्राहक देवो भवः – श्री. नितीन वाळके आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एकदिवसीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते तसेच या ग्राहक चळवळीची आवड असणाऱ्यांनी उपस्थित राहून प्रबोधन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शाखा अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील आणि मालवण तालुका शाखा अध्यक्ष श्री. श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स