ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरेत दोन दिवसीय व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्र संपन्न.

तळेरेत दोन दिवसीय व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्र संपन्न.

प्रकाशन: 03 Jun 2025 02:20 PM
वाचन संख्या 31

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य.

ब्यूरो न्यूज : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन येथे ३० व ३१ मे रोजी दोन दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनांपासून दूर राहण्याचा व समाजात आरोग्यदायी विचार रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा कार्यक्रम डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या प्रज्ञांगण – तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, १ मे ते ३१ मे या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘अमली पदार्थ विरोधी महिना’ म्हणून मोहिम राबवण्यात येत असल्याने या मार्गदर्शन सत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. अनिल नेरुरकर यांच्या मार्गदर्शनातून श्रावणी व सतीश मदभावे हे तळेरे येथे कार्यरत असलेले नाधवडे येथील दाम्पत्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात तंबाखू, व्यसनमुक्ती आणि कॅन्सर प्रतिबंधक चळवळीचे कार्य सातत्याने करीत आहे. त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती, शाळा – विद्यार्थी संवाद, व्यसनमुक्त संकल्प अशा उपक्रमांतून विविधांगी सामाजिक परिवर्तनाचा वसा उचलला आहे.

३० मे रोजीच्या मार्गदर्शन सत्रात सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वावलंबन, नीतिमूल्ये यांची महती स्पष्ट केली आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे उपाय सांगितले. त्यानंतर श्रावणी मदभावे यांनी तंबाखूचा इतिहास, त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, व्यसनामुळे होणारी कौटुंबिक आणि सामाजिक हानी यावर माहिती देत विद्यार्थिनींना ‘व्यसनी जोडीदार टाळा सुरक्षित भवितव्य निवडा’ असा सल्ला दिला.

दुसऱ्या दिवशी (३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन) नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रीमती अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना ‘निर्व्यसनी व्हा, स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा’ या त्रिसूत्रीचा संदेश दिला. प्रा. प्रशांत हटकर यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी केले तर आभारप्रदर्शन सतीश मदभावे यांनी केले. या कार्यक्रमात ८० विद्यार्थी उपस्थित होते. मानवी साखळी आणि तंबाखू विरोधी घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली.

स्पर्शिका मदभावे, मेधांश मदभावे आणि स्वरूप परब या लहान मुलांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोशनी बागवे, स्मितेश पाष्टे, आशिष घाडी, आर्यन पांचाळ, यश खरात, सिद्धांत खांडेकर, साक्षी मेस्त्री, उपासना जाधव, श्रेया साळुंखे यांचे मोलाचे योगदान लाभले. श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे सर्व विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक भान आणि ‘व्यसनमुक्त युवा – बलशाली भारत’ या संकल्पनेचा संदेश देणारा ठरला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स