ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
तळेरे लघू पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तळेरे लघू पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

प्रकाशन: 03 Jun 2025 01:46 PM
वाचन संख्या 39

ब्यूरो न्यूज : तळेरे लघू पाटबंधारे प्रस्ताव क्रमांक ४२/९५ च्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी दालनात जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारी, तळेरे प्रकल्पबाधित ग्रामस्थ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लघु पाटबंधारे विभाग अधिकारी श्री. जाधव, श्री. माणगावकर, भुसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, तळेरे एमएसईबी चे अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग यांचे पाणी अधिकारी यांच्या समक्ष तळेरे प्रकल्पग्रस्तांच्यावतीने तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण, मोहन भोगले, अशोक भोगले, राजाराम तावडे, चंद्रकांत चव्हाण, मधूकर चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, दशरथ बांदिवडेकर, निलेश पवार, अरविंद पवार हे उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाचे जिल्हाधिकारी यांनी वाचन करून त्यानंतर प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा केली.

प्रकल्पग्रस्तांच्यावतीने सर्व विषयावर मोहन भोगले, विश्वनाथ चव्हाण, निलेश पवार, अरविंद पवार, अशोक भोगले, चंद्रकांत चव्हाण, मधूकर चव्हाण यांनी प्रत्येक विषयाबाबत सविस्तर प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारले. यावेळी प्रत्येक प्रश्नांना योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले व प्रत्येक प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याबाबत संबंधित सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले. विषेशतः जे स्वेच्छा अनुदानाला वंचित आहेत त्यांना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळेल असे सूचित करून आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जो न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे प्रकल्प बाधीत सर्व शेतकऱ्यांना त्या प्रमाणे वाढीव रक्कम मिळेल असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासित करून त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व कागदपत्र प्रत्येक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर देण्याबाबत सूचना केल्या.

पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी जनता दरबार मध्ये दिलेल्या निवेदनानुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सूचने प्रमाणे योग्य ती कार्यवाही करावयास सांगितल्या प्रमाणे झालेल्या या बैठकीत जवळ जवळ सर्वच प्रश्न सोडवले जातील अशी प्रकल्पग्रस्तांची खात्री होत आहे आणि त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी यांचे आभार प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केले जात आहेत. याबद्दल दिलीप तळेकर आणि सरपंच हनुमंत तळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनाही वाघाच्यावाडीतील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. या प्रकल्पातील सर्व अडचणी आपल्या विभागा कडून लवकरात लवकर सोडविल्या जातील असेही आश्वासन ल.पा. ओरोस विभाग प्रमुख श्री. जाधव यांनी दिले असल्याने त्यांचेही वाघाच्यावाडीतील ग्रामस्थांच्या वतीने समितीतील सर्वानी आभार मानून सभा समाधानकारक व निर्णायक झाल्याने उपस्थित वाघाच्यावाडीतील प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या विविध विषयांवर सकारात्मक सहकार्य केल्याबाबत समितीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन भोगले यांच्याकडून समाधान व्यक्त करून यापुढेही असेच सहकार्य लाभू देत आणि वाघाच्यावाडीतील विकास कामाला चालना मिळूदेत अशी भावना व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स