शरद गावडे यांचा सेवानिवृती निमित्त तिरवडे येथे सन्मान.
मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत तिरवडे कर्मचारी श्री. शरद गावडे हे निर्धारित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत व गावाच्या वतीने त्यांचा तिरवडे येथे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
शरद वसंत गावडे यांच्या २९ वर्षांच्या सेवेदरम्यानच्या विविध कामांबाबत सरपंच सौ. रेश्मा गावडे, श्री. जयेंद्र परब यांनी मनोगत व्यक्त केले. माजी ग्रामपंचायत अधिकारी सुशांत चौगले यांनी कोल्हापूरहून येत उपस्थिती दर्शवली व शुभेच्छा दिल्या.
खोटले ग्रामपंचायत अधिकारी श्री. कृष्णाजी दळवी यांनी, श्री. गावडे यांनी उत्तम काम केले आणि गावासाठी खूप चांगली सेवा दिली असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यमान ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर, विनोद रावले, ग्रामपंचायत सदस्य सुमित मेस्त्री, कृषीसहाय्यक पवनकुमार सौगंडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपसरपंच सुशिल गावडे, ग्रामपंचायत सदस्या विशाखा गावडे, विनया गावडे, सायली गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास गावडे, पोलीस पाटील संतोष जामसांडेकर, दाजी सावंत, गौरव सावंत, करुणा भोसले, साक्षी गावडे, गावडे आदी ग्रामस्थ महिला तसेच शरद गावडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या कार्यक्रमात सिआरपी सौ. जामसांडेकर यांनी स्वागतगीत सादर केले आणि श्री. जयेंद्र परब यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)