ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण..!

आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण..!

प्रकाशन: 02 Jun 2025 06:01 PM
वाचन संख्या 63

राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा निर्णय.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा.

ब्यूरो न्यूज : राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने, आता शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे असा निर्णय घेतल्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

मुलांमध्ये लहानपणापासून राष्ट्रभावना वाढीस लागावी, यासाठी सरकारचा प्रस्ताव आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त सैनिक, स्पोर्ट टीचर, एनसीसी, स्काऊट गाईडचे प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्‍याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, भुसे म्हणाले. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या ‘यिन’ व्‍यासपीठाद्वारे आयोजित ‘समर युथ समिट २०२५’ या दोन दिवसीय निवासी शिबिराच्‍या समारोपप्रसंगी दादा भुसे बोलत होते.

भुसे म्‍हणाले, “जिल्‍हा परिषदेच्‍या ४८ शिक्षकांना सिंगापूर येथे नुकतेच अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्‍यवस्‍थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्‍पना असल्‍याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. येत्‍या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येईल. यात पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याचा मानस आहे.”

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्‍हावी, ‘नेशन फर्स्‍ट’ हा विचार रुजविण्याच्‍या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्‍तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स