पद्मश्री अच्युत पालव यांच्या माध्यमातून कोकणच्या अतुल्य प्रतिभेची जगाला पुनः प्रचिती : श्रीकांत सावंत.
पद्मश्री अच्युत पालव यांच्या लालबाग वासियांच्या वतीने भव्य सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती.
मुंबई | ब्यूरो न्यूज : श्री. अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफी या पारंपरिक कलेच्या उपासनेला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि कोकणातील अतुल्य प्रतिभेची जगाला पुनः प्रचिती आली. आज कोकणसह संपूर्ण लालबाग मुंबईला याचा अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले. पद्मश्री अच्युत पालव यांच्या लालबागवासियांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून मंचावरुन संबोधन करत होते.
यावेळी, कोकणातील व लालबाग मधील चाहते मित्र मंडळी आणि अनेक गणेशोतव मंडळ कार्यकर्ते, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ लालबागचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी पद्मश्री अच्युत पालव यांच्या कारकीर्दीतील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला.
पद्मश्री अच्युत पालव यांनी त्यांच्या कारकीर्दीत सहकार्य केलेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि मान्यवर, आयोजक तसेच उपस्थितांचे आभार मानले
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)