उद्योजक केदार झाड यांचा वाढदिवस संविता आश्रमात साजरा.
गरजूंसाठी साहित्य व रोख रकमेची मदत.
आश्रमाच्या वतीने संस्थापक संदीप परब यांनी मानले आभार.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण, वायरी भूतनाथ येथील पर्यटन व्यावसायिक आणि उद्योजक केदार झाड यांनी त्यांचा वाढदिवस, १ जून रोजी पणदूर येथील संविता आश्रमात साजरा केला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने केदार झाड यांनी कुडाळ पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली. यावेळी पूजा झाड, संदीप बोडवे, जगदीश वेंगुर्लेकर, प्रशांत मताई, विशाल वेंगुर्लेकर, मुकेश आचरेकर, सागर भाटकर आदी उपस्थित होते.
केदार झाड आणि पूजा झाड यांनी संविता आश्रमा मधील निराधार, मतिमंद, वृद्ध, गरजू महिलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
संविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब, किसन चौरे यांच्याकडून आश्रमाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आश्रमातील ांकडे आश्रमातील गरजूंसाठी जेवणासाठी आवश्यक असे साहित्य आणि रोख मदत प्रदान केली. त्याचप्रमाणे पुढेही आश्रमाच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. केदार झाड आणि पूजा झाड यांनी केलेल्या मदतीबद्दल आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी त्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)