आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत म्युझिकल फाऊंटनची पाहणी.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोती तलावात ‘म्युझिकल फाऊंटन’ सुरू होत आहे. या कारंजाची आमदार केसरकर यांनी गुरुवारी सायंकाळी पाहणी केली.
साडेचार कोटी निधीतून हा कारंजा उभारण्यात आला असून याच्या ट्रायल्स सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर त्याचे लोकार्पण होणार आहे. पर्यटनदृष्ट्या हा कारंजा सावंतवाडीतील मुख्य आकर्षण केंद्र ठरेल. इथे कारंजासह बोटींग, तलावाकाठी खाऊगल्ली, योगा सेंटर आदीही सुरू होणार आहेत. ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क, शिल्पग्राम आदी गोष्टी इथे आहेत. त्यामुळे पुढील काळात पर्यटन क्षेत्रात हे शहर आकर्षण ठरेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रसाद महाले, प्रतीक बांदेकर, नंदू शिरोडकर, शैलैश मेस्त्री, मोरजकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)