ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कुंभारमाठ येथील ढाबा प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कुंभारमाठ येथील ढाबा प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन.

प्रकाशन: 30 May 2025 12:52 PM
वाचन संख्या 37

न्यायालयीन कोठडीतील आरोपींच्या वतीने ॲड. स्वरूप पई व ॲड. खानोलकर यांनी पाहिले काम.

मालवण | ब्यूरो न्यूज : कुंभारमाठ येथील खालसा पंजाबी ढाबा येथे जेवण न दिल्याच्या रागाने झालेल्या वादविवाद व मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले प्रथमेश रविंद्र शिरपुटे वय २६ राह. सोमवारपेठ मालवण व वैभव बाळकृष्ण मयेकर वय ३३ राह. धुरीवाडा मालवण यांना ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी प्रत्येकी रक्कम रु ५०,०००/- चा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

१० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ च्या सुमारास प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी, हरेश वसंत ढवळे हे इसम ढाब्यावर जेवण देण्यासाठी वादविवाद करुन जेवण देत नसल्याच्या रागातून या सर्वानी अनोळखी ३ इसमांना बोलावून सर्वानी मिळून ढाबा मालक, मॅनेजर व कामगार यांना मारहाण केली व काचेच्या बाटलीने डोक्यावर मारहाण करून जीवघेणा हल्ल्या केल्याची व गंभीर दुखापत केल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी रोजी दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी यांना अटक केली होती. हरेश वसंत ढवळे याला वैद्यकीय तपासणीमध्ये इजा आढळल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. याच दरम्याने संशयितांनी त्यांना ढाबा मालक व कामगार यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानेच वादविवाद झाल्याची परस्पर विरोधी तक्रार केल्याने ढाबा मालक व कामगार यांचेविरुद्ध देखील मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

अटक संशयितांना मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयितांना १५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपी क्र. ३ प्रथमेश शिरपुटे याने मे. सत्र न्यायालय ओरोस येथे केलेला जामीनअर्ज तपासकाम अपूर्ण असल्याच्या व अन्य आरोपी अटक झाले नसल्याच्या कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून संशयीत न्यायालयीन कोठडीत आहेत.

त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करुन एकूण सात आरोपींविरुद्ध मे. मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर आरोपी क्र. १ व ३ यांनी मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती २८ मे रोजी मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग-ओरोस यांनी आरोपींना प्रत्येकी रक्कम रु. ५०,०००/- चा सशर्त जामीन मंजूर केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स