ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक.

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक.

प्रकाशन: 27 May 2025 10:57 PM
वाचन संख्या 57

मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचा आंदोलनाचा इशारा.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायरी, तारकर्ली व देवबाग या रस्त्यावर भूमिगत वीज लाईनसाठी खोदाई करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला खड्डे निर्माण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावे, अन्यथा ठाकरे शिवसेनेकडून या खड्ड्यांमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक संबंधित विभागाला दिला आहे.

याबाबत हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. वायरी, तारकर्ली, देवबाग हा मुख्य मार्ग असून या मार्गावर भूमिगत वीज लाईनचे काम करताना रस्त्याची खोदाई करण्यात आली. यामुळे या रस्त्याची साईडपट्टी खराब होऊन रस्त्याच्या बाजूला खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खराब झाला असून अनेक वाहन चालकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा. हे खड्डे त्वरित न बुजविल्यास त्याच खड्ड्यामध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आंदोलन छेडण्यात येईल, हरी खोबरेकर यांनी म्हटले असल्याची माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स