ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेत्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेत्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान.

प्रकाशन: 27 May 2025 10:31 AM
वाचन संख्या 23

मळगाव | प्रतिनिधी : येथील मुख्य राज्यमार्गाला जोडणाऱ्या बाजारपेठ ते वेत्ये रोड ग्रामपंचायतच्या वाडीजोड रस्त्यांचे काम ठेकेदाराकडून निधी अभावी अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले होते.
या वाडीजोड रस्त्यावरील खडीकरण पावसाळ्यात वाहून जाऊन रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.

या भागातील ग्रामस्थांनी एकत्र येत खडी, वाळू, सिंमेट गोळा करत या रस्त्यावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवले. रस्त्यालगत आलेली झाडी झुडपे तोडण्यात आली. या खड्ड्यांमुळे बाईकस्वारांचे अपघातही घडले होते असे समजते आहे.

या कामासाठी मळगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय धुरी यांच्यासह मंगेश राऊळ, मदन शिरोडकर, काशीनाथ सोनुर्लेकर, विलास राऊळ , प्रकाश साळगावकर, अथर्व धुरी, प्रथमेश खडपकर, सुरेश गावडे, इंगळे यांनी श्रमदान केले.

या रस्त्याचे अपूर्ण अवस्थेतील डांबरीकरण ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स