कोमसाप मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा ८ जून रोजी.
जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के तसेच केंद्रीय प्रतिनिधी रुजारिओ पिंटो यांची मार्गदर्शनपर उपस्थिती.
कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची माहिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी दुपारी ठीक ३:३० वाजता डॅफोडील्स रिसॉर्ट आचरे या ठिकाणी आयोजित केली आहे. या सभेला सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे आवाहन मालवण अध्यक्ष श्री. सुरेश शा. ठाकूर आणि कार्यवाह श्री. अनिरुद्ध आचरेकर कोमसाप मालवण यांनी केले आहे.
सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, जमा खर्च अहवाल वाचन (२०२४-२५), नवीन कार्यकारणी निवड २०२५ ते २८, चालू वर्षीच्या कार्यक्रमाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मस्के तसेच केंद्रीय प्रतिनिधी रुजारिओ पिंटो उपस्थित राहतील. तरी सदर सभेला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे, आवाहन सुरेश ठाकूर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)