जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत देवलीतील गणेश चव्हाण व युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत देवली गावातील युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण व युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदार संघात सुरू झालेल्या विकास कामांनी प्रेरीत होऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे अशी माहिती मिळत आहे.
यावेळी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, वेदिका चव्हाण, उमेश चव्हाण, प्रतिक देऊलकर, चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)