मालवण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिका स्तरीय निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था सारथी मार्फत मालवण पंचायत समिती शिक्षणाधिकारी संजय माने यांचा सत्कार अप्पर जिल्हाधिकारी, कोल्हापूर तथा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, सह-व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून मालवण तालुका अग्रक्रमांकांमध्ये ठेवण्यात सातत्याने प्रयत्नशील असणारे मालवण शिक्षणाधिकारी संजय माने यांचे कौतुक होत आहे.
मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य शाळाशाळांमध्ये पोहचवण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल मालवण शिक्षणाधिकारी संजय माने यांचा सन्मान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार मालवण तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, साधना केंद्रातील सर्व कर्मचारी सर्वांच्या अथक परिश्रमामुळे प्राप्त झाला असून हा मालवण तालुक्याला मिळालेला बहुमान आहे असे संजय माने यांनी म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)