गतिमान विकास असाच सुरू राहील.
आ. निलेश राणे यांचे मसुरकर जुवाबेट येथे धूप प्रतिबंधक बंधारा कामाचे भूमीपूजन प्रसंगी प्रतिपादन.
आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : मसुरकर जुवा बेटाच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये निधीची तरतूद मी आमदार झाल्यानंतर झाली. मागील दहा वर्ष विरोधकांनी काहीही केले नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे, विकास कामांची आहे. म्हणूनच महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ पाच महिन्यात पाचशे कोटींची कामे प्रगती पथावर आहेत. गतिमान विकास असाच सुरु राहील असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मसुरे येथील मसुरकर जुवा बेट येथे केले.
मालवण तालुक्यातील मसुरकर जुवा बेट येथील श्रीदेवी भवानी आई, श्री देव मूळ पुरुष आणि श्री देव होळ देव या देवस्थानाच्या व ग्रामस्थांच्या संरक्षणार्थ ३ कोटी ४८ लाख निधी मंजूर करून धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आई भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवात देवीचे दर्शन घेतले.
कालावल खाडीपात्रातील मसुरकर जुवा बेट येथील ३ कोटी ४८ लाख रुपये निधी मंजूर असलेल्या धूप प्रतिबंधक बंधारा कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर, पतन विभागअभियंता श्री समाधान जाधव, सौ. सरोज परब, दीपक पाटकर, महेश बागवे, राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष साटवीलकर, दादा साईल, सौ. लक्ष्मी पेडणेकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब, बाबू परब, मंदार लुडबे, दया देसाई, विश्वास मसुरकर, सुरेश मसुरकर, जितेंद्र परब, बाबू आंगणे, तात्या हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर, मसुरकर कुटुंबीय आदी मसुरे कावा ग्रामस्थ उपस्थित होते. मसुरकर कुटुंबियांच्या वतीने आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)