ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
दिल्या तारखेच्या आधी...!

दिल्या तारखेच्या आधी...!

प्रकाशन: 15 May 2025 09:25 PM
वाचन संख्या 78

तोंडवळी – तळाशील रस्त्याचे काम मार्गी.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा स्थानिकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातल्या तोंडवळी फाटा ते तळाशील वाडी या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. याबाबत स्थानिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी १५ मे २०२५ पूर्वी रस्त्याचे काम मार्गी लावू असा धीर देत, स्थानिकांना आश्वस्त केले होते . त्यानुसार या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांचा सत्कार केला आणि आभार मानले.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण विकास कामांसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जयप्रकाश परुळेकर, सरपंच आचरा जेरॉन फर्नांडिस, डॉ. प्रमोद कोळंबकर, सरपंच तोंडवळी नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदळकर, केळुसकर, सदस्य भूपाल मालंडकर, अनन्या पाटील, सुजाता पाटील, गणेश तोंडवळकर, तारी, श्रीकृष्ण रेवंडकर, विश्वनाथ खवणेकर, विजय पाटील, कल्पेश नाईक, पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स