दहावीच्या परीक्षेत भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या मुलांचे सुयश.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणचा निकाल ९७.२२ टक्के लागला. या परीक्षेस ७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७० उत्तीर्ण झाले. या शाळेतून आर्यन आनंद गोलतकर ९५.६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आला.
या हायस्कुलमधून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये विशेष प्रविण्य श्रेणीत २५, प्रथम श्रेणीत २९, द्वितीय श्रेणीत १५ तर उत्तीर्ण श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला.
या प्रशालेतून जान्हवी प्रमोद चव्हाण ही ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर भूमिका प्रसाद केळूसकर ९२ टक्के गुण मिळवून तृतीय आली. प्रणव मिलिंद डिचवलकर याने ९१.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि भावेश ललितकुमार वराडकर हा विद्यार्थी ९१ टक्के गुण मिळवून पाचवा आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)