ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २१ व्या वर्षी १००% निकाल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २१ व्या वर्षी १००% निकाल.

प्रकाशन: 13 May 2025 02:54 PM
वाचन संख्या 412

३३ विद्यार्थ्यांना ‘डिस्टींक्शन…!’

मालवण | सानिका वायंगणकर : इयत्ता १० वीच्या परीक्षेत, २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. रोझरी इंग्लिश स्कूलच्या १००% निकालाचे हे सलग २१ वे वर्ष आहे.

यंदा, रोझरी इंग्लिश स्कूलचे सर्व ५० विद्यार्थी विद्यार्थीनी १० च्या परीक्षा निकालात यशस्वी झाले असून त्यातल्या ३३ जणांना ‘डिस्टींक्शन’ मिळाले आहे. १२ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर ५ जण द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. चैत्राली मेस्त्री हिने ९५.८% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाच्या कु. वेदांती फोंडेकर हिला ९३.८% तर तृतीय क्रमांकासाठी कु. एरीक मेंडिस व कु. तृष्टी केळुस्कर यांना प्रत्येकी ९२.८% गुण प्राप्त झाले आहेत. चतुर्थ क्रमांकाच्या कु. एल्विरा राॅड्रिग्ज हिला ९०.२% गुण प्राप्त झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने, मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सर्व यशस्वी विद्यार्थी – विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स