ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवराय पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवराय पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन.

प्रकाशन: 10 May 2025 09:22 PM
वाचन संख्या 79

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचीही उपस्थिती.

| ब्यूरो न्यूज : मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. ११ मे रोजी दर्शन घेऊन पूजन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२:३० वाजता होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत.

राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मे. राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीकडून करण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम राम सुतार यांचे सुपुत्र शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. समुद्राच्या दिशेने तलवारधारी स्थितीत आणि योद्ध्याच्या आवेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची ६० फूट असून जमिनी पासून उंची ९३ फूट एवढी आहे. संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला असून पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे. तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे.

या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन होणार आहे. या पूजन समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आम. निरंजन डावखरे, आम. ज्ञानेश्वर म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, सा. बां. विभाग (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, बांधकाम सचिव संजय दशपुते, सा. बां. कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडी विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभाग सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स