शाळांना दिवाळी सुट्टीची तारीख जाहीर !
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळी सुट्टीचे परिपत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जारी केले आहे. दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांच्या सहीने हे परिपत्रक शाळांना प्राप्त झाले आहे. पूर्वी दिलेल्या दिवाळी सुट्टी परिपत्रकामध्ये बदल करण्याचे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान दिवाळी सुरू होण्यास अजून साधारणपणे पाच दिवस असताना त्यापूर्वीच सुट्टी जाहीर झाल्याने शिक्षण वर्तुळात शासनाच्या अकस्मात घेतलेल्या या सुट्टीतील तारीख बदलाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)