हळवल गाव चार्जवर ; ग्रामस्थांमधून व्यक्त होतेय नाराजी
कणकवली | उमेश परब (ब्युरो चीफ, सिंधुदुर्ग) : कणकवली शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला हळवल गाव सध्या चार्जवर आहे. प्रशासकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हळवल ग्रामसेवक पदी मंगला बिलकुले या कार्यकरत होत्या त्यावेळी नागरिकांची कामे जलदगतीने होत होती. त्यानंतर बिलकुले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सिद्धेश गोसावी यांना प्रभारी म्हणून पाठवण्यात आले आहे. हे पद अनेक दिवस चार्जवरच आहे. त्यासोबत सध्या शेतीचे दिवस चालू असतानाच कृषीसेवक पदही रिक्त असून यापदावर प्रभारी म्हणून कळसुली येथे कार्यकरत असलेल्या वेर्लेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यासोबतच गावात कायदा व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून पोलीस पाटील पद महत्वाचा दुवा मानला जातो. मात्र हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कासरल येथील उदय सावंत यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे. ही सर्व पद रिक्त असल्यामुळे हळवल वासीयांना शासकीय कामासाठी विलंब लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असले तरीही हळवल गाव दुर्लक्षित आहे. याबाबत हळवल गावातून नाराजी व्यक्त होत असून ही पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी हळवल ग्रामस्थांमधून होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)