विकास कसा करायला हवा हे आम्हाला चांगलं माहीत आहे.
शक्तिपीठ महामार्गाबाबत शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची भूमिका.
सावंतवाडी | प्रतिनिधी : शिवसेना महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधत शक्तिपीठ महार्गाबाबत भूमिका स्पष्ट केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध करणारे माझे मित्र आहेत. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्याने जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही जंगले राखली, म्हणून विकास थांबवायचा का, शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने मी ठाम आहे. हा शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडायला हवा. जेणेकरून कोकणचा हापूस आंबा फळफळावर नागपूर दिल्लीपर्यंत पोहोचेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपण हे सुचित करणार आहे त्यामुळे विरोधकांनी उगाच या प्रकल्पाला विरोध करून आमच्या विकासाच्या आड येऊ नये असे शिवसेनेचे प्रवक्ते तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. ते आतापर्यंत या भागाच्या जनतेच्या विकासासाठी झटले आहेत. त्यामुळे आता जनतेचा विकास कसा करायला हवा हे चांगलं माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच या प्रकल्पाला विरोध करून आमच्या विकासाच्या आाड येऊ नये असा त्यांनी सल्ला दिला आहे. ते पुढे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवू नका. जैवविविधतेचे काय ते नुकसान होतंय यासाठी त्यांच्यासह चर्चेला बसावं. हा मार्ग केल्यामुळे समृद्धी येणार आहे. अन्यथा आमच्या लोकांनी भुकेने मरायचे का, इथे उद्योग, विकास व्हायला नको का, असे सवाल आ. दीपक केसरकर यांनी केले. आमच्या लोकांनी जंगले राखलीत. त्यावर अधिकारही त्यांचाच आहे. महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे असही ते म्हणाले. नागपूरचा टायगर बघितल्यावर इथला ब्लॅक पँथर बघायला पर्यटक आले पाहिजे. इथला समुद्र बघायला लोक आले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडला तसाच हा शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा ही माझी मागणी आहे. येथून नागपूरची संत्री, माल परदेशात जाऊ शकतो असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)