ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात नागरिकांचे बंदर निरीक्षकांना निवेदन

मालवणात नागरिकांचे बंदर निरीक्षकांना निवेदन

प्रकाशन: 02 May 2025 11:31 AM
वाचन संख्या 83

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बंदर जेटी येथील जुन्या जेटीचे साहित्य जेटीच्या बाजूला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून उठवण्यात यावे, असे निवेदन मालवण येथील पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, नागरिकांमार्फत बंदर निरीक्षक, मालवण यांना देण्यात आले आहे.

मालवण बंदर जेटी येथील रस्ता काम गेले तीन महिने सुरू होते. यावेळी येथील स्थानिक व्ययसायिक तसेच ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. येणारे पर्यटक मालवण बंदर जेटी याठिकाणी फिरकत नसल्याने याचा फटका स्थानिकांना बसत होता. २९ एप्रिल रोजी हा रस्ता खुला करण्यात आला. परंतु हा रस्ता बनविताना जुना रस्ता खणून यथिकांचे सर्व साहित्य, माती, दगड, रस्त्याचे काँक्रीट, हे सर्व समुद्रकिनारी टाकण्यात आले आहे. याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता काम पूर्ण झाल्यानंतर सर्व साफसफाई करण्यात येईल असे त्याने सांगितले होते.

परंतु अद्याप याठिकाणी कोणती ही साफसफाई करण्यात आलेली नाही. यामुळे पावसात होणारे धोके उद्भवण्याचे यातून स्पष्ट होत आहे. पावसामुळे सर्व माती, दगड, काँक्रीट हे पाण्याच्या ओघाने समुद्रात वाहून जात मालवणच्या जुन्या जेटीच्या खाली अडकून राहण्याची दाट शक्यता असून भविष्यात याचा त्रास किल्ला प्रवासी वाहतूक व छोट्या मच्छिमारांना आहे.

तरी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती पर्यटन व्यवसायिक नागरिक रोहन आचरेकर, संजय नार्वेकर, जॉनी फर्नांडिस, राजेश आढाव, कीर्तिदा तारी, संजय लांबोरे, धीरज बोडेकर, रोशन भोगले, गणेश भोगले, अब्दुल मुकादम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स