जिल्ह्यात 'ए आय' पर्वाचा शुभारंभ.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ए आय प्रणालीचे प्रात्यक्षिक.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या एआय प्रणालीचे गुरुवारी ओरोस मध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. ना. नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनात एआय प्रणालीचा समावेश झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा, ‘ए आय युक्त जिल्हा’ करण्यामागील संकल्पना विषद केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)