ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वायरीतील युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन.

वायरीतील युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन.

प्रकाशन: 28 Apr 2025 07:53 PM
वाचन संख्या 158

मालवण | ब्यूरो न्यूज : वायरी येथील महेश प्रमोद मातोंडकर (२८) या युवकाची मेंदूच्या रक्तस्रावामुळे प्रकृती गंभीर असून त्याचा जीव वाचविण्यासाठी उपचाराची आवश्यकता आहे. सध्या महेश याच्यावर मुंबईतील सोमय्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपूर्ण उपचारासाठी पंधरा लाख रूपयांची आवश्यकता आहे. मातोंडकर यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने मातोंडकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. यामुळे महेश याच्या उपचारासाठी दाते, सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मातृत्व आधार फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे. वायरी भूतनाथ येथील माणगावकर काजू फॅक्टरीनजीकचे रहिवासी असलेले प्रमोद मातोंडकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी प्रमोद मातोंडकर यांची पत्नी प्रियांका मातोंडकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेला वर्षही लोटले नसताना त्यांचा मोठा मुलगा महेश हा कामानिमित्त मुंबईत आहे. नुकताच त्याचा विवाह झाला असून घर सावरणारा महेश हा ब्रेनस्ट्रोक येऊन बाथरूममध्ये पडला. त्याला मुंबई येथील सोमय्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. तो बेशुद्ध अवस्थेत आहे. डॉक्टरांनी संपूर्ण उपचारासाठी १५ लाख रु. खर्च सांगितला आहे. महेश याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. मातोंडकर कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे. यामुळे दानशूर व्यक्तींनी महेश याच्या उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन कुटुंबियांनीही केले आहे. सदर मदत रक्कम मातृत्व आधारकडे जमा होणार आहे. महेश मातोंडकर याला आर्थिक मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बैंक, शाखा तारकर्ली, ता. मालवण, खाते क्रमांक ०६१४०००००००५२३७, आयएफएस नंबर SIDC०००१०६१ (संपर्क- ९४०४३९६१८२).

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स