ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुलेला कोमसाप मालवणच्या वतीने ३० पुस्तके.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुलेला कोमसाप मालवणच्या वतीने ३० पुस्तके.

प्रकाशन: 23 Apr 2025 03:45 PM
वाचन संख्या 133

मालवण | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबईच्या दादर शाखेच्यावतीने आयोजित आनंद सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ९५ वा वाढदिवस साहित्य संबंधित उपक्रमांनी साजरा होत आहे. यामध्ये कोकण मराठी साहित्य परीषदेच्या सभासदांनी प्रकाशित केलेल्या ‘९५ किलो पुस्तकांची तुला’ होणार आहे.

शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासदांनी प्रकाशित केलेल्या ९५ किलो पुस्तकांची पुस्तक तुला करण्यात येणार असल्याची माहिती कोमसाप जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो यांनी दिली आहे.

रुजारिओ पिंटो ( जिल्हा समन्वयक, कोमसाप)

ग्रंथतुलेमध्ये कोमसाप मालवणचे अध्यक्ष व साहित्यिक सुरेश ठाकुर यांची सिंधु साहित्य सरिता, बीज अंकुरे अंकुरे, येगं येगं सरी अशी ३ पुस्तके, कोमसाप जिल्हा समन्वयक व कवी रुजारिओ पिंटो यांची माऊली, आम्ही मालवणी, दर्याच्या देगेर अशा ३ पुस्तकांचा समावेश आहे.

श्री. सुरेश ठाकुर ( अध्यक्ष, कोमसाप मालवण.)

ग्रंथतुलेसाठी पाठवलेल्या अन्य लेखकांची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

बुलंद जंजिरा सिंधुदुर्ग ( माधव कदम), कल्याण कटोरा ( वैशाली पंडित ), मालवणीतल्या वाटा ( गोविंद काजरेकर), दोन समाजवादी स्नेही ( शंभू भाऊ बांदेकर), भक्ती लिलामृत भाग १, २ व श्री दत्त साक्षात्कारी संत( सीताराम करमरकर), सिंधुदुर्गातील कविता ( वैभव साटम), आठवणीतले नामवंत( रविंद्र वराडकर ), सुक्या सुंगटाची कढी ( सुयोग पंडित) अशा पुस्तकांच्या प्रत्येकी दोन प्रती मिळून एकूण ३० पुस्तकांचा समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स