ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज (शेगांव) भक्तमंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न.

मालवणात श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज (शेगांव) भक्तमंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न.

प्रकाशन: 12 Apr 2025 07:39 AM
वाचन संख्या 185

युवा कीर्तनकार प्रथमेश सामंत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड नजिकच्या श्री गजानन महाराज (शेगांव) भक्तमंडळाच्या वतीने, १२ एप्रिल २०२५ रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ( हनुमान जयंती) साजरा करण्यात आला. यावेळी पहाटे ५ वाजता किर्तनकार प्रथमेश सामंत यांच्या किर्तनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. त्यांना अक्षय सातार्डेकर यांनी पेटी ( संवादिनी ) तर वैभव मांजरेकर यांनी तबला व युवराज कुर्ले यांनी पख़वाज वादनाने साथ दिली.

यावेळी किर्तनकार प्रथमेश सामंत यांनी सांगितले की आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगामध्ये देह, देश व धर्माला ग्लानी येऊ देऊ नये. पहाटे ५ वाजता आयोजित किर्तनाला उपस्थित सर्व भाविकांची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

यावेळी श्री गजानन महाराज (शेगांव) भक्तमंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री प्रभाकर देऊलकर यांनी पदाधिकारी व सदस्यांचे तसेच सोहळ्याला सहकार्य केलेल्यांचे व उपस्थित भाविकांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स