ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे कावावाडी हनुमान मंदिर येथे ११ ते १५ एप्रिल दरम्यान श्री हनुमान जन्मोत्सव.

मसुरे कावावाडी हनुमान मंदिर येथे ११ ते १५ एप्रिल दरम्यान श्री हनुमान जन्मोत्सव.

प्रकाशन: 10 Apr 2025 05:38 PM
वाचन संख्या 111

श्री देव हनुमान मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा तसेच विविध कार्यक्रम.

भंडारी समाजसेवा संघ मसुरे कावावाडी यांच्यावतीने उपस्थितीचे आवाहन.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी जय बजरंग बली नाट्य मंडळाच्या भव्य रंग मंचावर सांस्कृतिक सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लघु रुद्र व अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, १०.३० वाजता जय बजरंग बली नाट्य मंडळाचा ऐतिहासिक नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता कीर्तन व हनुमान जन्मोत्सव, सकाळी साडे सहा वाजता पालखी सोहळा, सकाळी ११ वाजता नेत्रचिकित्सा आणि आरोग्य तपासणी शिबिर, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ७.३० वाजता जय बजरंग बली प्रसादिक भजन मंडळाचे सुश्रव्य भजन, ८.३० वाजता कावावाडीतील दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, तसेच कावावाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा, १०.३० वाजता दत्त माऊली पारंपरिक दशावता नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार.

रविवार दि. १३ एप्रिल रोजी १० वाजता कावा वाडीतील महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, १४ एप्रिल ८.३० वाजता जय बजरंग बली प्रसादिक भजन मंडळाचे महा ट्रीक्स सीन युक्त दिंडी नृत्य, दहा वाजता स्नेहभोजन .सर्व कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन भंडारी समाजसेवा संघ मसुरे कावावाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स