ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रज्ञाशोध परिक्षेत जि. प. शाळा नेरुर शिरसोसच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

प्रज्ञाशोध परिक्षेत जि. प. शाळा नेरुर शिरसोसच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

प्रकाशन: 10 Apr 2025 05:19 PM
वाचन संख्या 142

कु. पियुष लाड जिल्ह्यात प्रथम.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत नेरूर शिरसोस शाळेच्या इयत्ता चौथीतील कु. पियुष विजय लाड याने एकूण ३०० पैकी २८४ गुण मिळवले व जिल्ह्यात प्रथम प्राप्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत नेरुर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस शाळेच्या अन्य विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळवले.

कु. पियुष लाड.

सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीचा निकाल १००%लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी २००हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. सान्वी प्रकाश केरकर २३६ गुण, जयेश महेश नेवगी २१८ गुण, पार्थ अनिल नेवगी २१६ गुण, रुद्र मिलिंद केरकर २१६ गुण वअथर्व यशवंत गावडे २१२ गुण प्राप्त केले आहेत.

चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. अरुणा घाटकर, सौ. प्रीती कुबल, सौ. पूजा कोठावळे, मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण ठाकूर आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री गोविंद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, पालक संघ व ग्रामस्थ नेरुर शिरसोस यांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स